फुटीर नगरसेवक आज कोकण आयुक्तांपुढे हजर राहणार

0

पूनम पोळ

मनसेला राम राम करून शिवसेनेत गेलेले सहा नगरसेवक आज कोकण आयुक्तांपुढे आपली बाजू लेखी स्वरूपात मांडणार आहेत. मनसेने या नगरसेवकांविरोधात कोंकण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्याची सूचना कोकण आयुक्तांनी केली आहे.मनसेच्या सातपैकी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडचिट्ठी दिली होती. मनसेमधून बाहेर पडताना आपला गट बनवत सर्वच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे मनसेने कोकण आयुक्तांकडे तक्रार संबंधित नगरसेवकांना पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या बैठकांमध्ये प्रवेश देऊ नये, प्रस्तावावर मतदान करण्यापासून रोखावे, त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी पत्रातून केली होती. मनसेच्या या तक्रारीनुसार कोकण आयुक्तांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून संबंधित नगरसेवकांना लेखी स्वरूपात बाजू मांडण्यास हजर राहण्याची सूचना केली. पालिकेने शुक्रवारी हे पत्र सहाही नगरसेवकानी पाठवले. दरम्यान, शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुट्टी आल्याने हे नगरसेवक कोंकण आयुक्तांसमोर सोमवारी (३० ऑक्टोबर) रोजी बाजू मांडण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.कोकण आयुक्तांच्या पत्रानुसार आमचे लेखी म्हणणे तयार केले असून उद्या आम्ही कोकण आयुक्तांसमोर सादर करू, अशी माहिती एका नगरसेवकाने सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here