सकल मराठा समाजाचा १० जानेवारीला बंद नाही

'समाजकंटक' महाराष्ट्र बंदची अफवा पसरवली जात असल्याचा मराठा समन्वय समितीचा आरोप

0

भिमा कोरेगावच्या दंगली नंतर मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंद करण्यात येणार असल्याची बातमी काही खोडसळ लोकांकडून जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. सकल मराठा समाजाने कोणताही बंद पुकारला नसल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून देण्यात येतेय.

काही खोडसाळ प्रवृत्तींकडून सध्या ”सकल मराठा समाजाचा १० जानेवारीला बंद ” असा मेसेज सोशल मिडीयावर पसरवला जात आहे. असा कोणताही बंद सकल मराठा समाजातर्फे पुकारलेला नाही याची सर्व मराठा बांधवांनी नोंद घ्यावी.

मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी तसेच मराठा समाजात फूट पाडण्यासाठी १० जानेवारीला बंद असल्याचा मेसेज फॉर्वर्ड करणारे ‘समाजकंटक’ अफवा पसरवत आहे. अशा अफवा पसवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे. तसेच याबाबत पोलिसांना माहिती देण्याची विनंती सकल मराठा समाजाकडून करण्यात आलीय.

दरम्याण सोलापूरमध्ये विशाल प्रकाश सातपुते या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. १० जानेवारी २०१८ रोजी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.

फेसबुकवर ही पोस्ट कोणी टाकली याचा सायबर सेलकडून शोध घेतल्यानंतर विशाल सातपुतेने ती पोष्ट प्रसिध्द केल्याचे समोर आले. त्यामुळे सायबर सेल विभागाच्यावतीने सातपुते यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. या चौकशीवेळी त्याने ही पोट डिलीट केल्याचे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here