राज्यातील पहिल्या सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0

अण्णा हजारे, बावनकुळे, रामशिंदे, देशमुख,विखे पा‍टील उपस्थित राहणार…

शासनाच्या ऊर्जा विभागातर्फे व महानिर्मितीच्या वतीने शनिवार दिनांक 4 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 10 वाजता राज्यातील पहिल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन अहमदनगर जिल्हयातील राळेगणसिध्दी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे.या सोबतच उत्पादन शुल्क विभागाच्या ग्रामरक्षक दलची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून सरपंच मेळावाही आयोजित करण्यात येत आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द समाजसेवक अण्णा हजारे राहणार आहेत. या कार्यक्रमाला ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, जि.प अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.या दोन्ही कार्यक्रमांना खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडे, आ. डॉ सुधीर तांबे, आ. अरूणकाका जगताप, आ. डॉ. अपूर्व हिरे, आ. बाळासाहेब थोरात, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. विजय आष्टी, आ. भाऊ साहेब कांबळे, आ. सौ. स्नेहलता कोल्हे, आ. सौ मोनिका राजळे, आ. वैभव पिचड, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, पं.स सभापती राहुल झावरे तसेज राळेगण सिध्दीच्या सरपंच रोहिणीताई गाजरे उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमात जिल्हयातील सर्व सरपंच नागरिक व शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंग, ऊर्जा प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व अहमदनगर जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here