‘ठाकरे’ सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला तुडुंब गर्दी

0

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेला ठाकरे चित्रपट आज (25 जानेवारी) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल चित्रपटगृहात भल्या पहाटे साडेचार वाजता चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला तुडुंब गर्दी झाली आहे.
या शोसाठी संपूर्ण सिनेमागृह सजवण्यात आलं होतं. पहाटे चार वाजता आधी पूजा करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. शोचं उद्घाटन या चित्रपटाचे दिगदर्शक अभिजीत पानसे यांनी केलं. यावेळी ढोलताशा पथकाच्या गजरात या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शोला सुरुवात झाली.
‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान मानापमान नाट्याविषयी विचारलं असता, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी नाराजी नसल्याचं सांगितलं. तसंच पानसेंनी चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला.
नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here