शाळा परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा -रणजित पाटील

शहराच्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत

0

सोलापूर : शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा यांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज येथे दिल्या.

पाटील यांनी सांगितले की, ‘महिला, मुले, मुली यांच्या संरक्षणाबाबत विशेष दक्षता घेतली जावी. सायबर क्राईमचे आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकारचा गुन्हे तपास गतीने व्हावा यासाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्याचा गुन्ह्याची उकल हाण्यासाठी प्रभावीरित्या वापर केला जावा.’

पाटील यांनी सांगितले की, पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेल्या नागरिकांना कमीत कमी वेळात आपली फिर्याद नोंदवता यावी यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक केली जावी.

गुन्हे सिद्धता वाढण्यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती केली जावी यासाठी प्रस्ताव पाठवले जावेत. त्यामुळे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न होतील. जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि लोकसहभागातून शहराच्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत. यामुळे व्हिजीबल पोलिसिंग वाढेल आणि गुन्हेगारीला आळा बसवणे शक्य होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here