दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करा – उध्दव ठाकरे

कारवाई करा आम्ही सोबत आहोत

0

 

कोणत्याही नेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करायला हवी अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलीय.

कमला मिलमधिल दुर्घटनेत जबाबदार असणा-या पब मालकांना पकडण्यासाठी पोलिसांना बक्षीस जाहीर करावे लागते हा कहरच झाला असल्याचे सांगत. उध्दव ठाकरे यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी कोणाचाही दबावला बळी न पडता अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. शिवसेना पक्ष त्यांच्यासोबत आहे. मात्र कारवाई करत असताना बांधकाम अधिकृत आहे किंवा अनधिकृत याची खातरजमा करावी.

कमला मिलमध्ये दुर्घटना घडली. त्याच्या एक दिवस आधी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे तिथे गेले होते. यावरुन विरोधकांनी टीकाही केली होती. याला आज शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी उत्तर दिले.  मंत्रालयाला आग लागली होती त्या आधी मुख्यमंत्रीही तिथे गेले होते. त्यामुळे असे आरोप करणे योग्य नसल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

कमला मिल प्रकरणात पब मालकांना पकडण्यासाठी पोलिसांना बक्षीस जाहीर करावे लागते हा म्हणजे कहरच झाला. इनाम जाहीर करायला ते दहशतवादी आहेत का असा सवाल करीत, या पबचे मालक सापडत नसतील तर गृहखाते काय करत आहे अशी बोचरी टिकाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here