कोपार्डेत स्वाईन फ्लूने माहिलेचा मृत्यू

0

सांगरूळ : कोपार्डे (ता. करवीर) येशील नंदीवाले वसाहतीत राहणाऱ्या सौ.संगीता युवराज नंदिवाले या माहिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठवडयापूर्वा त्या जत येथे यात्रेनिमित्त गेल्या होत्या. तेथुन परतल्यानंतर ताप, खोकला यांचा संसर्ग झाल्याने खासगी दवाखान्यात दाखल झाल्या. तेथे घशातील स्त्रावाची चाचणी केली असता स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.परंतु उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांनंतर , आरोग्य खात्याची दहा पथके गावात दाखल झाली आहेत. त्यांनी गावात तपासणी केली असता आणखी एक वृद्ध रूग्णला लागण झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जी.डी.नलवडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here