न्यूजटेलचे मांगले, सुतार यांना पुरस्कार जाहीर

0

गारगोटी (प्रतिनिधी) :

स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगाव (ता. भुदरगड) या संस्थेच्या वतीने देण्यात येणार्‍या आदर्श पत्रकार पुरस्कारामधील इलेक्ट्रॉनिक मिडिया विभागाचे पुरस्कार न्युजटेल वेबपोर्टलचे उपसंपादक विकास सुतार व अभिजित मांगले यांना जाहिर करण्यात आले आहेत. सुतार यांना आजरा तालुक्यासाठी तर मांगले यांना गडहिंग्लज तालुक्यासाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याचबरोबर भुदरगड, राधानगरी, कागल, आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील विविध विभागातील पुरस्कारही जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण रविवार (दि. २७) रोजी समारंभपूर्वक गारगोटी येथे वितरण होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज येडुरे यांनी दिली.

या संस्थेकडून गेली ५ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, महिला सबलीकरण, युवक संघटन, आमचा गाव आमचा विकास या सर्व विषयांवर समाजाचे प्रबोधन करत आहे. त्याचबरोबर समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना स्वराज्य पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सन २०१८-२०१९ मध्ये स्वराज्य पुरस्कार राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड व कागल तालुक्यातील मान्यवरांना देण्यात येणार आहे.

पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे : राधानगरी तालुका : आदर्श पत्रकार पुरस्कार : विजय पाटील, (दै. तरुण भारत), आदर्श साप्ताहिक पुरस्कार : श्रीकांत पाटील, (साप्ताहिक दुधगंगा काठ), इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कार : श्रीकांत जाधव, (बी न्यूज), समाज भूषण पुरस्कार प्रविण शिवलिंग ढोणे, (दै. पुढारी), आदर्श ग्रंथालय पुरस्कार : ईश्वर सार्वजनिक वाचनालय, हेळेवाडी, आदर्श माता पुरस्कार : प्रा. सौ. ऐश्वर्या पालकर

भुदरगड तालुका : आदर्श पत्रकार पुरस्कार : नितीन बोटे, (न्यूज मराठी २४), आदर्श साप्ताहिक पुरस्कार : सुभाष माने, (साप्ताहिक भुदरगड टाईम्स), आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कार : शिवाजी पाटील, (बी न्यूज), समाज भूषण पुरस्कार : आनंद चव्हाण, (दै. महासत्ता), आदर्श ग्रंथालय पुरस्कार : कै. के. के. कवडे सार्वजनिक वाचनालय, बसरेवाडी, स्वराज्य आदर्श माता पुरस्कार : प्रा. सौ. सुषमा अरुण पाटील, स्वराज्य इतिहास कालीन लेखणी पुरस्कार : अरविंद चोडणकर, (दै. पुण्यनगरी)

आजरा तालुका : आदर्श पत्रकार पुरस्कार : बशीर सिकंदर मुल्ला, (दै. पुण्यनगरी), आदर्श साप्ताहिक पुरस्कार : संभाजी दत्तू जाधव, (साप्ताहिक रणरागिणी), आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कार : विकास पांडुरंग सुतार, (न्यूजटेल वेब पोर्टल उपसंपादक), समाज भूषण पुरस्कार : रणजित हिंदुराव कालेकर, (दै. सकाळ), आदर्श ग्रंथालय पुरस्कार : रामलिंग वाचनालय, मेढेवाडी,

गडहिंग्लज तालुका : आदर्श पत्रकार पुरस्कार : प्रविण मारुती आजगेकर, (दै. पुढारी), आदर्श साप्ताहिक पुरस्कार : दत्तात्रय सखाराम देशपांडे, (साप्ताहिक गडहिंग्लज प्रगती), आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कार : अभिजित वसंत मांगले, (न्यूजटेल पोर्टल उपसंपादक), समाज भूषण पुरस्कार : अवधुत पाटील, (दै. सकाळ), आदर्श ग्रंथालय पुरस्कार : महात्मा गांधी वाचनालय, मुगळी

चंदगड तालुका : आदर्श पत्रकार पुरस्कार : निवृत्ती गुंडोपंत हारकारे, (दै. तरुण भारत), आदर्श साप्ताहिक पुरस्कार : संतोष वसंतराव सावंत-भोसले, (साप्ताहिक चंदगड टाईम्स, संपादक), आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कार : संतोष मारुती सुतार, (चंदगड लाईव्ह न्यूज वेब पोर्टल), समाज भूषण पुरस्कार : नंदकुमार पांडुरंग ढेरे, (दै. लोकमत), आदर्श ग्रंथालय पुरस्कार : रामलिंग वाचनालय, तुडये

कागल तालुका : आदर्श पत्रकार पुरस्कार : प्रकाश कारंडे, (दै. महाराष्ट्र टाईम्स), आदर्श साप्ताहिक पुरस्कार : तानाजी पाटील, (साप्ताहिक गावगन्ना), आदर्श इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कार समाधान म्हातुगडे, (गाव माझा न्यूज व लाईव्ह २४ तास), समाज भूषण पुरस्कार : रमेश पाटील, (दै. पुढारी), आदर्श ग्रंथालय पुरस्कार : कै. विजयमाला मंडलिक सार्वजनिक वाचनालय, हळदी, स्वराज्य जीवन गौरव पुरस्कार : सर्जेराव अवघडे, समाज कृतज्ञता पुरस्कार : सचिन अनिल जंगम
या पुरस्कारार्थीची निवड करण्यात आलेली आहे अशी माहिती स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज येडूरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here