डॉ एम एस स्वामिनाथन…आयोग आणि शिफारशी …

१८ नोव्हेंबर २००४ रोजी हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषक आयोगाची रचना करण्यात आली . २००६ पर्यंत या आयोगाने एकूण ६ अहवाल सादर केले. ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर केलेल्या शेवटच्या अहवालात आयोगाने शेतकऱ्यांचा दुरावस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले.

4

कोण आहेत डॉ एम एस स्वामिनाथन…? डॉ.एम.एस.स्वामिनाथन वनस्पतींचे कृषी आणि जैव वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रशासक आहेत. यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ कुम्भकोनम तामिळनाडू येथे झाला.
कृषी प्रधान भारतात पारंपारिक औजारे आणि बियाणांचा वापर केला जात होता. त्यातच भारताला अनेक वेळा ओल्या आणि कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत होते. कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी नव्या आणि प्रगत बियाणांचा विकास करणे गरजेचे होते. अशावेळी भारताला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनविण्यासाठी १९६६ मध्ये गव्हाच्या मेक्सिकन बीजामध्ये पंजाबमधील स्थानिक जातीचे संकर करून उच्च उत्पादन देणारे नवे संकरीत बियाणे तयार केले. यामुळे भारतातील गहू आणि तांदळाच्या उत्पादनात भरपूर वाढ झाली.आज भारत अनेक कृषी उत्पादनांची निर्यात करतो. म्हणूनच डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणतात.

विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी भारत सरकारने १९६७ साली पद्मश्री, १९७२ साली पद्मभूषण आणि १९८९ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. जैविक विज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. १९७१ साली सामुदायिक नेतृत्वासाठी रेमन मैगसेसे पुरस्कार, १९८६ मध्ये ‘अल्बर्ट आईन्स्टाईन वर्ल्ड सायंस पुरस्कार, १९८७ मध्ये पहिला ‘विश्व खाद्य पुरस्कार’, १९९१ मध्ये अमेरिकेत ‘वॉल्वो इंटरनेशनल एन्वायरमेंट पुरस्कार’, १९९९ मध्ये ‘यूनेस्को गांधी स्वर्ण पदक’ इत्यादी सन्मान त्यांना मिळाले.

१९९० च्या दशकात चेन्नई येथे ‘एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली.ते ‘वर्ल्ड अकॅडमी ऑफ साइंसेज़’ चे संस्थापक सदस्य आहेत.त्यांचे योगदान आणि विद्वत्तेमुळे इंग्लंड ची रॉयल सोसायटी तसेच बांगलादेश, इटली, चीन, स्वीडन, अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीत त्यांना सामील करून घेतले. १९९९ मध्ये टाइम मॅगझीन ने २०व्या शतकातील आशियातील प्रमुख २० प्रभावशाली व्यक्ती मध्ये त्यांची नोंद केली.

काय आहे स्वामिनाथन आयोग …?

शेती व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषक आयोगाची रचना करण्यात आली .
२००६ पर्यंत या आयोगाने एकूण ६ अहवाल सादर केले. ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर केलेल्या शेवटच्या अहवालात आयोगाने शेतकऱ्यांचा दुरावस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले.
५ ऑक्टोबर २००६ ला सरकारने कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना करून २००८ मध्ये शिफारशी लागू केल्या. त्यानंतर सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पण आज जवळपास १० वर्षे होऊन सुद्धा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी साठी देशातील शेतकरी वाट पहात आहेत.

स्वामिनाथन आयोगाच्या अहवालातील काही शिफारशी

# शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे असावे

# शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा

# शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी

# बाजाराच्या चढउतारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून “मूल्य स्थिरता निधी” ची स्थापना करावी

# आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा

# दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी “कृषी आपत्काल निधी” ची स्थापना करावी

# कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा

# पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा

# हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये, नैसर्गिक आपत्ती वेळी, पूर्वस्थिती येईपर्यंत सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे

# संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशारीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व “ग्रामीण विमा विकास निधी” ची स्थापना करावी.

# पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक च्या ऐवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे

# सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकऱ्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी

# परवडणाऱ्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी

# संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन

# शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात

4 COMMENTS

  1. थोडक्यात पण अत्यंत उत्तम परिचय… भारतातील अन्य विद्वानांचाही अशाच पद्धतीने परिचय करून द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here