स्वयंभूवाडीत नागपंचमी उत्साहात, पंधरा हजाराहुन अधिक भाविकांनी घेतले दर्शन

मोहन कारंडे

0

बोलोली : स्वयंभूवाडी ( ता. करवीर ) येथे नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. येथील स्वयंभू मंदिरात दर्शना साठी भावीकांनी गर्दी केली होती. रात्री बारा वाजता अभिषेक घातला व पूजा केली त्यानंतर दर्शन चालु झाले. मंडळ तसेच सामजिक कार्यकर्ते यांच्याकडून येणाऱ्या भाविेकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पाश्चिम करवीर मध्ये बालोली सह इतर बारा गावचे श्रद्धा स्थान असलेले स्वयंभू देवस्थान पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.
त्यामुळे करवीर, पन्हाळा, गगनबाबडासह हजारो भावीकांनी दिवसभर दर्शन घेतले. दरवर्षी येणाऱ्या भावीकांमध्ये हजारोने वाढ होत आहे, यावर्षी पंधरा हजारांहुन अधिक भाविक आले होते. दर्शनासाठी रस्त्यातच भरपावसात रांगेत उभे रहावे लागत होते आणि त्यातुनच वाहनांची ये जा चालु होती त्यामुळे भाविकांची गैरसोय झाल्याच्या भावना लोकांनमधुन व्यक्त होत होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here