गिजवणे उपसरपंचपदी सुवर्णा पाटील

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
गिजवणे (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भाग्यश्री पाटील होत्या.
ग्रामविकास अधिकारी डी.बी. कुंभार यांनी स्वागत केले. नूतन उपसरपंच पाटील यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील याच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, ए.आर.पाटील, आर.बी.कांबळे, मनोज पाटील, अशोक कमते यांची भाषणे झाली. यावेळी नितीन पाटील, अरविंद पाटील तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here