न्यूजटेलचे उपसंपादक सुतार, मांगले आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

0

गारगोटी (प्रतिनिधी) :

शेणगाव (ता. भुदरगड) येथील स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मिडिया विभागातील आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन न्यूजटेलचे उपसंपादक विकास सुतार व अभिजीत मांगले यांना एका शानदार समारंभात सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेत्री ‘इश्काची नौका’ फेम प्रांजल पालकर, करवीरचे पोलीस उपधिक्षक सुरज गुरव व कोल्हापूरच्या निर्भया पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक युवराज येडुरे व अध्यक्षा निवेदिता येडुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशदा पुणेच्या राज्यस्तरीय व्याख्यात्या राणी पाटील या होत्या. यावेळी स्वराज्य पुरस्काराने राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड व कागल तालुक्यातील पत्रकार, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडिया, समाज भूषण, ग्रंथालय अशा विभागात व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरवात शेणगावच्या ग्रंथालयाला ग्रंथभेट देऊन झाली. स्वागत संस्थेचे संस्थापक युवराज येडुरे यांनी केले. तर प्रास्ताविक अध्यक्षा सौ.निवेदिता येडुरे यांनी केले.

यशदा पूणेच्या राजस्तरीय व्याख्यात्या राणी पाटील म्हणाल्या, या पुरस्काराने उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे कार्य स्वराज्य कल्याण संस्थेने केले आहे. शिवाय पुरस्काराने पत्रकारांची सामाजिक जबाबदारी वाढली असून ती जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने ते पार पाडतील.

पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव म्हणाले, पत्रकार हा समाजाला आणि प्रशासनाला दिशा दाखवण्याचे काम करतो, त्यामुळे पत्रकाराचा सन्मान हा समाजासाठी भूषणावह आहे,असा पुरस्कार देऊन स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेने केलेले हे काम लाखमोलाचे आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, सिनेअभिनेत्री प्रांजल पालकर, निर्भया पथकाच्या स्नेहा पाटील, सरपंच सुरेश नाईक, सत्कार मूर्ती आनंद चव्हाण, संदीप बोटे, प्रशांत रणवरे यांची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here