प्रभाग क्रमांक ६२ च्या पोटनिवडणूकीला स्थगिती

0

 

निवडणूक आयोगाचे पालिकेला पत्र

पुनम पोळ
जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक ६२ ची पोटनिवडणूक मंगळवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली. या निवडणुकीबाबत लघुवाद न्यायलयाची सुनावणी सुरु असल्याने उच्च न्यायालयाकडून शिवसेनेने स्थगिती मिळवली. शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांनी बुधवारी याबाबतचे निकाल निवडणूक आयोग आणि पालिका प्रशासनाला सादर केले. त्यामुळे येथील पोट निवडणूकीला स्थगिती देण्याबाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत.अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र लघु वाद न्यायायालने अवैध ठरवल्याने त्यांचे नगरसेवक पद बाद झाले. त्यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविलेले शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांनी लघु वाद न्यायालयात याप्रकरणी दाद मागितली. या प्रकरणाची अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नसतानाही मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक २१ आणि ६२ ची पोटनिवडणूक जाहीर केली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र राजू पेडणेकर यांनी आधीच उच्च न्यायालयत जाऊन या प्रभागाच्या पोटनिवडणूकीला स्थगिती मागितली होती. लघुवाद न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या प्रभागात निवडणूक घेऊ नये, असे आदेश ३ नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निकालाची प्रत आज पेडणेकर यांच्या वकीलांनी राज्य निवडणूक आयोगाला आणि पालिकेच्या विधी विभागाला सादर केली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करावी, या निवडणूकीचा कार्यक्रम लावू नये असे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here