पीडित महिलांची आधारस्तंभ: संगीता पाटील

0

पालघर-योगेश चांदेकर

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद आवाज बुलंद करणाऱ्या व नारीशक्तीचा आधारस्तंभ म्हणून परिचित असलेल्या जिल्ह्यातील महिला संगीता प्रमोद पाटील यांच्याशी जागतिक महिला दिनानिमित्त केलेली बातचीत

पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी केव्हा सुरुवात झाली?

: आठ वर्षांपूर्वी मी स्वतः महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची कल्पना आहे. म्हणून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य सुरू केले.आज अशा शेकडो महिलांचे  समुपदेशन करून जगण्याची उमेद निर्माण करत आहे.

 

आपल्या घरातील प्रसंग ?

:” माझ्या पतीने१९९५ साली लग्नानंतर दोनच वर्षात माझा छळ केला. मला कित्येक वर्षे घराबाहेर पडण्यास मनाई केली. बाहेर पडले की मान वर करून बघण्याची मनाई होती. त्यामुळे मी पतीपासून विभक्त झाले. मुलांचे शिक्षण संगोपन करून आज मुलगी इंजिनिअर व मुलगा शिक्षण घेत आहे. कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर मला पोटगी व राहण्याची सोय उपलब्ध झाली.

कोणते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न ?

:” बलात्कार, परित्यक्ता, विधवा, निराश्रित व असहाय महिलांना मदत करते. शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देणे, एका महिन्यात आतापर्यंत अनेक महिलांना ९० लाख रुपये मिळवून दिले आहेत.

महिलांच्या हितावह भविष्यकालीन योजना ?

:जिल्हा प्रशासनाने कुपोषण निवारण समितीवर नेमणूक केली असून महिलांसाठी आश्रम सुरु करणार आहे. तेथे सर्व पीडित महिलांना अन्न, वस्त्र,निवारा, शिक्षण व आरोग्याचा प्रश्न सोडविला जाईल. त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल. सर्व पीडित महिलांना न्याय मिळवून देणे हे काम शेवटच्या क्षणापर्यंत करण्याची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here