चालत्या सुमो गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक

चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याचा प्रकार तासगाव मध्ये घडला आहे.

0

सांगलीच्या तासगाव मध्ये मंगळवारी रात्री चालत्या सुमो गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली आहे.विटा रोडवर कैलास लॉज जवळ हा प्रकार घडला.शॉट्सर्किट झाल्याने ही आग लागली. समोरच्या बोनेट मधून आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच ड्रायव्हरने गाडी थांबवली .यानंतर गाडीतील प्रवासी यानी पटकन उड्या मारल्या .यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही . तर क्षणात या आगीने भीषण स्वरूप घेतले यामुळे सुमो गाडी जळून खाक झाली आहे.घटनास्थळी तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामन गाडीने तातडीने दाखल होत ,आग आटोक्यात आणली परंतु या आगीत गाडीचे जवळपास ६ ते ७ लाख नुकसान झाले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here