कर्जबाजारी बिल्डरची कार कंटेनरला धडकवून आत्महत्या

0

राजू म्हस्के

औरंगाबाद : कर्जबारीपणाला कंटाळून बिल्डर ने आपली कार भर वेगात कंटेनरला समोरून धडकवून आत्महत्या केली. आत्महत्येस जबाबदार असणारे व्यक्तींचे नावही सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले. घटनेची  माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धावलेल्या फुलंब्री पोलिसांना बिल्डरच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमुळे हा प्रकार समोर आला. केंब्रिज चौक-सावंगी बायपासवर सोमवारी  सकाळी 10 वाजता ही घटना घडली. आत्महत्येसाठी या बिल्डरने  स्वत:च आपली कार कंटेनरवर घालून आत्महत्या केली.

फहीम खान रशीद खान (36, रा. लतीफनगर, देवळाई) असे मृत बिल्डरचे नाव आहे. त्यांची एम. के. कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम कंपनी आहे. शहराच्या आसपास विविध ठिकाणी त्यांच्या साईट सुरू आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फहीम खान हे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडले. ते कारने (क्र. एमएच 20 बीजी 2020) देवळाई भागातून केंब्रिज चौकामार्गे सावंगी बायपासने जात होते. त्याच वेळी समोरून येणार्‍या कंटेनर (क्र. एमएच 06 एक्यू 6303) समोर आपली  कार समोर घालून  जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. तर, कंटेनरचाही समोरचा भाग पूर्णपणे फुटला. तसेच, फहीम खान हे जागीच ठार झाले.

अपघात झाल्याचे लक्षात येताच जवळचे नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी फहीम खान यांना कारमधून बाहेर काढून लगेचच घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

फहीम खान यांची बांधकाम कंपनी आहे. नोटा बंदीचा निर्णय झाल्यानंतर त्यांचा व्यवसाय प्रचंड तोट्यात गेला. अनेक प्रयत्न करूनही कंपनी नफ्यात आली नाही. त्यामुळे व्यवसायासाठी कर्ज घेतले. यापैकी महेश तरटे याच्याकडून पैसे घेण्यात आले होते. त्याच्या पैशांची परतफेडही करण्यात आली होती. मात्र, त्याने आणखी तगादा लावला होता. तसेच, तो कार्यालयात येऊन त्रास देत होता. घरी येऊन धिंगाणा घालण्याची धमकी दिली होती. त्याच्या त्रासाला कंटाळूनच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख फहीम खान यांच्या सुसाईड नोट मध्ये आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here