राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत राज्याच्या मुलांच्या संघास यश

0

राजू म्हस्के

वेरुळ / गोवा ( प्रतिनिधी )फुटसाल असोसिएशन ऑफ गोवा यांनी राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ फुटसाल स्पर्धा आयोजीत केली असून ही स्पर्धा गोव्यातील पेड़े – म्हापसा येथील स्पोर्टस कॉम्प्लेक्सवर दि. 8 ते 12 डिसेंबर दरम्यान होत असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा मुला मुलींचा संघ बुधवारी दि. 6 डिसेंबर रोजी रवाना झाला होता.  शुक्रवारी या राष्ट्रीय खेळाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्राच्या  मुलांचा पहिला सामना सिक्किम राज्या सोबत रंगला होता. या रंगतदार झालेल्या सामन्यात महाराष्ट्राकडून सर्वप्रथम नँथ्यून स्टीवन्स याने पहिला गोल केला. सिक्किमने ही गोल करीत हा सामना बरोबर केला. पुन्हा महाराष्ट्रचा खेळाडू विशाल मगरे याने दूसरा गोल मारला तर महाराष्ट्र संघाने पहिलाच सामना 2 , 1 ने जिंकला तर मुलीं मध्ये झालेल्या मुंबई व महाराष्ट्र सामन्यात महाराष्ट्र च्या मुलींच्या पदरी अपयश आले. या दोन्ही संघाचे प्रशिक्षक म्हणून मोहम्मद रियाजुद्दीन हे काम पहात असून या पुढील महाराष्ट्राच्या मुलांचा  सामना गुजरातशी होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here