उपनगरीय रेल्वे-मेट्रोच्या डब्यांची लातूरमध्ये निर्मिती होणार

0

मुंबई : लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या भेटीत दिली आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री.गोयल यांचे आभार मानले आहेत.

सह्याद्री या राज्य अतिथीगृहावर केंद्रीय रेल्वे मंत्री श्री.गोयल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत या निर्णयाची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे मराठवाड्यातील आर्थिक औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here