३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम वर्ग – सुभाष देशमुख

शेतमालाच्या खरेदी विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक- देशमुख

0

जळगांव शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहे. कर्जमाफीच्या निकषात बसणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांस कर्जमाफीची रक्कम मिळणारच आहे असे सांगून सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १२ हजार कोटी जमा करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५८२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालाची साठवणूक करता आली पाहिजे. याकरीता बाजार समित्यांना गोडावून बांधण्यासाठी अल्पदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच पणन महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तसेच बोगस बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्यावर शासन कठोर कारवाई करीत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असेल त्यावेळेस मुबलक खते, बी-बीयाणे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या शेतमालाला चांगला बाजारभाव कुठल्या बाजार समितीत मिळेल याची माहिती मोबाईलवर मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येत असून शेतमालाच्या खरेदी विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून शेतकऱ्यांच्या मुलभुत गरजा पूर्ण करण्यावर शासनाने भर दिल्याचेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here