पाथर्डीत ट्रॅव्हल बस आणि ट्रक मध्ये धडक

धडकेत दोघे चालक ठार

0

प्रतिनिधी – पूनम पोळ

नगर –  पाथर्डी तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथे कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग ६१ वर ट्रक व खासगी ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.परभणीकडे प्रवासी घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक (ए. आर. 20 – 1490) व बीड जिल्ह्यातील माजलगाववरुन सरकी पेंड घेऊन जाणारा आयशर ट्रकची क्रमांक (एम. एच. 12 इक्‍यू- 8879) जोरदार धडक झाली.

यात बस व ट्रक या दोन्ही चालकांचा जागीच मृत्यूझाला. ट्रक चालकाचे नाव परमेश्‍वर लोखंडे तर बस चालकाचे नाव सोपान ढाकणे असे आहे. मंगळवारी पहाटेचारच्या सुमारास हा अपघात झाला.बस मधील सात ते आठ प्रवाशांना दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्थानिकांच्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स चालक हा ओव्हर टेक करताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर जाऊन धडकला. धडक एवढी जोराची होती की यात दोन्ही चालक जागीच ठार झाले. दोन्ही वाहनांचा पुढचा भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर मयत दोन्ही चालक वाहनांमध्ये अडकले होते.सकाळी जेसीबीच्या साह्याने एकमेकात अडकलेली वाहनेवेगळी करण्यात आली. मृतदेह पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here