औरंगाबादेत अतिक्रमण हटाव पथकावर दगडफेक, रेल्वेस्टेशन परिसरात तणाव

0

राजू म्हस्के

औरंगाबाद :रेल्वेस्टेशन समोरील चौकात असलेल्या जनता हॉटेल चे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकावर व जेसीबी वर अतिक्रमण करणारांनीं दगडफेक केल्याने, परिसरात तणाव निर्माण झाला आहे. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.

अतिक्रमण धारकांना यावेळी पोलीस तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांशी वाद घालत महापौर व आयुक्तांना बोलावण्याची मागणी केली. घटनास्थळी मोठा जमाव जमा झाल्याने पोलिसांना अधिक कुमक मागावी लागली. कारवाई दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

रेल्वेस्टेशन समोरील असलेल्या चौकात अतिक्रमण काढण्यासाठी महानगर पालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तासह सकाळी दहा वाजताच दाखल झाले होते. यावेळी अतिक्रमण धारकांनी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अनिल आडे, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी एम बी काझी, पदनिर्दषीत अधिकारी सी. एम. अभंग यांच्याशी वाद घालत अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला.  हॉटेल लगत असलेले धार्मिक्स्थळ असल्याने अतिक्रमण काढू नये अशी भूमिका यावेळी येथील नागरिकांनी घेतली. त्यामुळे महापालिका अतिक्रमण विभागाला दुपारपर्यंत येथील अतिक्रमण हटविता आले नाही.

याच परिसरातील पेट्रोलपंप हटवण्याची कारवाई मनपाने सुरुवातीला करावी नंतर पुढील अतिक्रमण काढावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. एकूणच तेथील एका विशिष्ट समाजाच्या जमावा समोर मनपाने नांगी टाकल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here