शिवसेनेने फुकटचे श्रेय लाटण्याचे थांबवावे

0

चंदगड :  कोवाड-माणगाव रस्त्यावरील निट्टूर गावातील पूर्णतः चढाव काढणे, सपाटीकरण, रस्ता मजबुतीकरण व सुरळीत सुरक्षित वाहतुकीयोग्य रस्ता करण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. असे असताना काही शिवसैनिक जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा उद्योग बंद करावा, असे आवाहन जि.प. सदस्या विद्या पाटील व कल्याण भोगण यांनी केले. कोवाड-माणगाव रस्त्यासाठी साडेतीन कोटीची निधी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केला आहे. यासाठी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी प्रयत्न केले आहेत. याकामी कार्यकारी अभियंता वेद पाठक, चंदगडचे उपअभियंता सचिन मांजरेकर यांनी ३० लाखाचा विशेष निधी मंजूर केला आहे. वास्तव परिस्थितीत उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्यात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून कारखाना प्रशासनाने विनंती केल्यावरून रस्त्याचे काम चालू नाही. आंदोलनकर्त्यांनी याची वास्तव माहिती घेऊनच आंदोलनाच्या तारखा जाहीर कराव्यात, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here