शाहू स्टेडियम ‘ शासनजमा ‘ होण्यास स्थगिती

0

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : येथील शाहू स्टेडियम शासनजमा करण्याच्या आदेशास प्रभारी अपर आयुक्तांनी स्थगिती दिली. दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाल्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्हा प्रशासनाला शाहू स्टेडियमचा ताबा घेण्यास मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या मंगळवार पेठेत बी वॊर्डमध्ये शाहू स्टेडियम अंतर्गत काही मिळकती आहेत. शाहू स्टेडियमची ही मिळकत केएसएल १ रुपया भाडेपट्ट्याने कायम भाडेतत्वावर दिली आहे. यासंदर्भात प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तक्रारीत शाहू स्टेडियमच्या मिळकती सरकारी आहेत. त्याची चौकशी करून त्या ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी केली होती. करवीर प्रांताधिकाऱ्यांनी चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या मालकीच्या छत्रपती शाहू स्टेडियमअंतर्गत क्र. २६०७अ, २६०७ब, २६०८-४, २६०८-५, २६१२ या मिळकतीत शर्ती, अटींचा भंग झाला आहे. त्याचे मूळ प्रयोजन बदलले आहे. त्या इनाम यादीतही दिसून येत नसल्याने सरकारी मालकीच्या आहेत. त्या सरकारजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले होते. नगर भूमापन विभागाने या मिळकती ताब्यात घेऊन त्यावर महाराष्ट्र शासन अशी नोंद करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाविरोधात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने अपील केले होते. प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनीही कॅव्हेट दाखल केले आहे. यासंदर्भात ३० जानेवारीपर्यंत प्रभारी अपर आयुक्तांनी ‘जैसे थे’ चे आदेश दिले होते. बुधवारी प्रभारी अपर आयुक्त अजित पवार यांच्यासमोर केएसएकडून अँड. शिराळकर यांनी तर प्रजासत्ताक संस्थेकडून दिलीप देसाई यांनी स्थगितीसंदर्भात बाजू मंडळी, प्रभारी अपर आयुक्त पवार यांनी शाहू स्टेडियमप्रश्नी अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना ताबा घेण्यास मनाई केली आहे. पुढील सुनावणी १३ मार्चला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here