वंदे मातरम म्हणण्यास विरोध करणाऱ्या आमदार अबू आझमीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांनी केले दहन

0

वंदे मातरम म्हणण्यास विरोध करून वादग्रस्त विधान करणाऱ्या सपा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात सांगली मध्ये शिवसेनेने आंदोलन केले आहे.यावेळी संतप्त शिवसैनिकांनी अबू आझमीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारता दहन केले आहे . तसेच अबू आझमी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात अली आहे . 

सांगली मध्ये आज शिवसेनेच्या वतीने वंदेमातरम म्हणण्यास विरोध दर्शवनाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील टिळक चौकात संतप्त शिवसैनिकांनी यावेळी आमदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत,पुतळ्याचे दहन केले आहे. तसेच यावेळी आबू आझमी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . तसेच वंदे मातरम न म्हणाऱ्या अबू आझमी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आशिया मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here