मुरगूड येथे १८ फेब्रुवारी पासून रंगणार लाल आखाडा चषक कुस्तीचा थरार

0

मुरगूड येथे १८ फेब्रुवारी पासून रंगणार लाल आखाडा चषक कुस्तीचा थरार
मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन
रणजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाचे आयोजन
खुल्या गटातील विजेत्यास मानाचा लाल आखाडा चषक व बुलेट मोटरसायकल उपविजेत्यास हिरो डिलक्स बाईक
मुरगूड प्रतिनिधी
मुरगूड ता.कागल येथे गोकुळ दुध संघाचे जेष्ठ संचालक  रणजितसिंह पाटील याच्या 61 व्या वाढदिवसा निमित्त  लाल आखाडा व्यायाम मंडळ, मुरगूड यांच्या वतीने दिनांक 18 ते 20 फेबुवारी दरम्यान लाल आखाडा चषक व  मॅट वरील भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर व दगडू शेणवी यांनी दिली.
सदर स्पर्धेसाठी तब्बल सुमारे  पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येणार आहे. प्रथम क्रमाकांच्या खुल्या गटातील कुस्तीसाठी  बुलेट गाडी व लाल आखाडा चषक, द्वितीय  क्रमांकास हिरो डिलक्स मोटर सायकल व चषक तृतीय क्रमांक 25हजार व चषक चतुर्थ क्रमांक -15 हजार व चषक पारीतोषिक देण्यात येणार आहेत.सदर स्पर्धा  विविध 11 वजनी गटात घेण्यात येणार असून विजेत्या प्रथम तीन क्रमांकास खालील प्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत.
खुला गट
७४ किलो:-अनुक्रमे २० हजार, १५ हजार, ११ हजार व चषक   ६५किलो ११ हजार, ९ हजार, ७ हजार व चषक
६१ किलो:९ हजार, ७ हजार, ५ हजार व चषक
५७ किलो: लाल आखाडा युवा केसरी चषक   ७ हजार, ५ हजार, ३ हजार व चषक
१७ वर्षांखालील
५० किलो :४ हजार,३ हजार,२ हजार व चषक
४६ किलो: ४ हजार,३ हजार,२ हजार व चषक
४२ किलो:२ हजार ५००,२ हजार, १ हजार ५०० रु व चषक
१४ वर्षाखाली
३५ किलो २२००, १७०० , १२००  व चषक
३० किलो:२१००,१६००,११०० रु व चषक
२५ किलो: २०००,१५००,१००0 रु व चषक
या कुस्ती स्पर्धेसाठी अद्ययावत व जागतिक स्पर्धांच्या नियमावली नुसार  “विश्वनाथ पाटील क्रीडा नगरी”  मैदान, फ्लड लाईट्स व प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार आहे. मुरगुड येथील प्राथमिक  शाळा नं 1 च्या मैदानावर ही सुसज्ज क्रीडा नगरी उभारली जाणार आहे. स्पर्धेची वजने 18 फेबुवारी रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत घेण्यात येणार असून स्पर्धे मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी  सोबत फोटो , 17 व 14  वर्षांखालील खेळाडूंनी ओळखपत्र बरोबर घेऊन येण्याचे आवाहन स्पर्धा कमिटीने केले आहे.
कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 20 फेबुवारी  रोजी माजी आमदार महादेवराव महाडिक,खासदार धनंजय महाडिक,माजी आमदार पी.एन.पाटील, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,आमदार अमल महाडीक,   गोकुळचे .अध्यक्ष रविंद्र आपटे,अरुण नरके,रणजितसिंह पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी सखाराम डेळेकर,एकनाथ बरकाळे,बजरंग सोनूले,अशोक खंडागळे,दत्तामामा जाधव,प्रकाश भोसले,सुरेश शिंदे,युवराज सुर्यवंशी, वासूदेव मेटकर,राजू सोरप,मोहन कांबळे,पृथ्वीराज कदम,मिरासो बेपारी,रमेश परीट,चंद्रकांत कुंभार,रविंद्र कांबळे,मनाजी सासने,धोडीराम माडेकर,सचिन मगदूम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here