राज्य सरकार पतंजलीचे एजंट आणि बाबा रामदेव खरे लाभार्थी- अशोक चव्हाण

लाभार्थी म्हणून बाबा रामदेव यांचाच फोटो लावा चव्हाणांचा सरकारला टोला

0

प्रतिनिधी- शशांक पाटील

मुंबई- भाजप सरकार हे आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पतंजलीची उत्पादने विकण्यास परवानगी देत असल्याने हे सरकार पतंजलीचे एजंट झाले असून  याचे लाभार्थी बाबा रामदेव आहेत अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
सरकारने लाभार्थी म्हणून बाबा रामदेव यांचाच फोटो लावावं असा टोलाही अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
याविषयी बोलताना चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार जनतेच्या हिताची कामे सोडून आता पतंजलीसारख्या कंपनीचे वितरक बनले आहे. सरकारी कर्मचा-यांच्या माध्यमातून पतंजलीची उत्पादने विकण्याचा घाट सरकारने घातला आहे.
यापूर्वीही राज्य सरकारने कवडीमोल दराने पतंजलीला ६०० एकर जमीन दिली आहे.बाबा रामदेव यांनी काँग्रेस सत्तेत असताना विदेशातील काळ्या पैशाबद्दल अनेक बेछूट आरोप केले होते. विदेशी बँकांमध्ये भारतीयांचे २५ लाख कोटी रुपये असल्याचा शोध रामदेव बाबांनी लावला होता. त्यावेळी मोदींनी त्यांची पाठराखण केली होती. परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर मोदींनीच विदेशी बँकांमध्ये २५ लाख कोटी नसल्याचे जाहीर करून घुमजाव केले. सत्तेत येण्यासाठी बाबा रामदेवांनी भाजपची मदत केली होती त्याची परतफेड म्हणून सरकारपतंजलीवर मेहेरबान झाले आहे.
अशा प्रकारे पतंजली सारख्या कंपन्यांना मदत करण्यापेक्षा सरकरने महिला बचत गटांसाठी कामे करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here