सामानगड स्वछता अभियानात उद्या सयाजी शिंदे होणार सहभागी

0

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) :
चित्रपटांसह सामाजिक क्षेत्रात कृतिशील नेतृत्व सिद्ध केलेले अभिनेते सयाजी शिंदे गडहिंग्लजकरांच्या भेटीला येणार आहेत. रविवारी (ता. २४) किल्ले सामानगड येथील स्वच्छतेच्या श्रमदानात ते स्वतः सहभागी होणार आहेत. सकाळी सात वाजता दुर्गप्रेमींनी श्रमदानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सामानगडाचे संवर्धन करणे हीच खरी शिवरायांवरील भक्ती आहे. गडकोटांचे संवर्धन हे कर्तव्य समजून दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक रविवारी किल्ले सामानगडवर स्वच्छता मोहीम राबविली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो. यामुळे गडाची स्वच्छता राखण्यास मदत होत आहे. या मोहिमेची माहिती मिळाल्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनीही मोहिमेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते रविवारी सामानगडावर येत आहेत. प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेऊन स्वच्छतेचा मंत्र तरुणांना देणार आहेत. श्री शिंदे यांनी चित्रपटातील अभिनयाद्वारे नाव कमावलेच आहे. परंतु सह्याद्री देवराईच्या माध्यमातून लाखो झाडांचे संगोपन करणारे वृक्षप्रेमीही आहेत. सामानगडावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या संवर्धन मोहिमेचा भाग होण्यासाठी ते स्वतः येत आहेत. सकाळी दुर्गप्रेमींनीही सामानगडावर दाखल व्हावे. येताना पाणी बॉटल व हलकी न्याहरी किंवा जेवण सोबत घेऊन येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here