एस एस कम्युनिकेशन गडहिंग्लज येथे मान्यवरांच्या हस्ते सॅमसंग व विवो मोबाईलचे लॉंचिंग

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मोबाईलसाठी लोकप्रिय असे भव्य दालन एस एस कम्युनिकेशन येथे काल ( दि.१०) रोजी मा. राजे समरजितसिंह घाटगे यांच्याहस्ते सॅमसंग व विवो कंपनीचे बहुचर्चित मोबाईलचे लॉंचिंग करण्यात आले.
मेन रोड गडहिंग्लज येथील विविध अँड्रॉइड मोबाईलचे एकमेव ठिकाण असणारे एस एस कम्युनिकेशन येथे सॅमसंग एस १० व विवो व्ही १५ या मोबाईलचे लॉंचिंग म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी उपनगराध्यक्षा सौ. कावेरी चौगुले यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी बोलताना समरजीत राजे म्हणाले मोबाइल मध्ये असणाऱ्या अद्यावत सुविधांमुळे ग्राहकांचा फायदा होईल, मोबाइल ही आज काळाची गरज बनली आहे फक्त संभाषण न्हवे तर कोणतीही माहिती आपण पटकन मिळवू शकतो.
यावेळी उद्योगपती सुनिल चौगुले, संजय तराळ, युवराज पाटील, वीवोचे अधिकारी तरुण नगर, सुनिल दळवी, मेनेजर वैभव बुवा, तनुजा माळगी, भारती हजारे, गौरी संकपाळ, स्मिता मोरे, गिरिजा कागे उपस्थित होते.
सर्वांचे स्वागत एस एस कम्युनिकेशनच्या ओनर सुप्रिया शहा यांनी केले तर आभार महेश शहा यांनी मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here