एमपीएससीसाठी अनाथ उमेदवारांची विशेष वर्गवारी- देवेंद्र फडणवीस

राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल - मुख्यमंत्री

0

प्रतिनिधी – जयश्री भिसे

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षेत अनाथ मुलांसाठी राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे अाश्वासन त्यांनी दिले. राजभवन येथे झालेल्या मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण हाेऊनही अनाथ असलेल्या अमृता नावाच्या मुलीला नाेकरी मिळण्यात अडचण येत हाेती. यासंदर्भात तिने अलीकडेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हाेती. या भेटीची अाठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या मुलीची अडचण लक्षात घेऊन अनाथ मुलांसाठी स्वतंत्र वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे.

जे विद्यार्थांना जात माहीत नाही अशा युवक- युवतींना राखीव काेट्यातून नाेकरी मिळवण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन अनाथ विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्गवारी करण्याचा निर्णय सरकार घेणार अाहे. ही विशेष वर्गवारी करण्यासाठी लवकरच विधेयक अाणण्यात येर्इल व हे विधेयक मंजूर करून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल.

यामुळे येणाऱ्या काळात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनाथ मुलांना या वर्गवारीमध्ये नाेकरी मिळू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, असा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो उमेदवारांना याचा फायदा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here