मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ डहाणूच्या प्रयत्नांमुळे डहाणूतील सोनोग्राफीचे दर कमी

0

पालघर – योगेश चांदेकर

पालघर – मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ डहाणूच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सोनवणे, सेक्रेटरी तसेच युवासेना उप जिल्हा युवा अधिकारी डॉ. आदित्य अहिरे, ट्रेझरर डॉ. अमोल गायकवाड, डॉ.साेमेश शहा ह्यांनी वेस्टकाॅस्ट डायग्नोस्टिक सेंटरला व स्पर्श डायग्नोस्टिक सेंटरला सोनोग्राफीचे दर कमी करण्यासंदर्भाचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाला मान देत वेस्टकाॅस्ट डायग्नोस्टिक सेंटर तसेच स्पर्श डायग्नोस्टिक सेंटर ह्यांनी अधिकृतरीत्या असोसिएशनचे सेक्रेटरी तसेच युवासेना उप जिल्हा युवा अधिकारी डॉ. आदित्य अहिरे ह्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांची भूमिका स्पष्ट केली व गाेर गरिब रुग्णांणकडून ह्या पुढे 500 रु सोनोग्राफीचे दर आकारणार असल्याचे जाहिर केले.

यावेळी डॉ.सोनवणे, डॉ.आदित्य अहिरे डॉ.अमाेल गायकवाड, डॉ.शहा, डॉ.अरुण पाटील, डॉ.नितीन पाटील, डॉ. निकम, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सोनकळे,डॉ. गुजराती, डॉ.ढमाळ, डॉ.अस्वार, डॉ. कुंभार,डॉ.संदीप पाटील, डॉ. हेमंत भोये, डॉ.दिनेश पाटिल, डॉ.पागधरे, डॉ.नितीन साळुंके, डॉ.चिराग तांडेल आदि व मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ डहाणूच्या सर्व डॉक्टरांकडून सोनोग्राफीचे दर कमी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाल्याबद्दल डहाणूतील जनतेकडून ह्या सर्व डॉक्टरांचे व मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ डहाणूचे आभार व कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here