तंत्रज्ञान अधिविभागात सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट विषयावरील कार्यशाळा संपन्न

0

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग आणि आर्ट ऑफ लीव्हींग यांच्या संयुक्त विद्यमाने सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट विषयावरील तीन दिवसांची कार्यशाळा १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान तंत्रज्ञान अधिविभागात आयोजीत करण्यात आली. श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या पुढाकारातून तंत्रज्ञान अधिविभागातील अंतीम वर्षात शिकणा-या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

      या कार्यशाळेअंतर्गत प्रशिक्षक विशाखा परुळेकर यांनी तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थ्यांना विविध सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने कम्युनिकेशन स्कील, प्रेझेंटेशेन स्कील,ग्रुप डिस्कशन आदी विषयावर सखोल मार्गदर्शन व तसेच  प्रात्यक्षिक यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर मुलाखतीवेळी   होणा-या चुका व त्या टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांमधुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अंतिम वर्षातील एकुण २३८ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये भाग घेतला. कार्यशाळेमध्ये उपस्थित असणा-या सर्व विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हींग तर्फे प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहेत.  या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना कैंम्पस प्लेसमेंटसाठी तसेच व्यक्तीमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी याचा फायदा होणार आहे असे प्रतिपादन तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. जयदीप बागी यांनी केले.  या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अमर डूम यांनी काम पाहीले तसेच डॉ. ए. के. साहू, डॉ. पी. डी. पाटील, श्री. नीतीन अलझेंडे व श्री. उदय पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here