समाजासाठी झटणारे व्हसकोटी यांच्यसारखे दुर्मीळ : प. पु. गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

ज्या समाजात आपण जन्म घेतो, त्या समाजाचे आपण देणे लागतो, याच भावनेतून डॉ. गंगाधर व्हसकोटींनी समाजासाठी केलेले कार्य मोठे आहे. त्यांनी कोणतीही अपेक्षा न बाळगता गोरगरिब व वंचितासाठी काम केले आहे. हणबर समाजाला लाभलेला समाजसेवक डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचे काम खूप मोठे आहे. असे समाजासाठी झटणारे दुर्मीळ आहेत. असे प्रतिपादन करीमठाचे प. पू. गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले .

हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे समाजभूषण डाॅ. गंगाधर व्हसकोटी आयोजित हिंदू हणबर गवळी समाज मेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. गंगाधर व्हसकोटी होते.

डॉ. गंगाधर व्हसकोटी म्हणाले की, नोकरी, अनुदान, लाभार्थी, शासनाचे कामसाठी आज मेळावा घेतला असून आपल्या सीमाभागातील सर्व हिंदू गवळी समाजातील लोकांनी एकजूट होऊन आपल्या समाजातील शासकीय किंवा निमशासकीय कोणतीही काम असेल तर एक होऊन काम करूया व आपल्या समाजाला मोठे करूया.

पल्लवी हंडे, वेदीका कोकरेकर, माया पाटील, गीता पाटील, स्वाभिमानीचे राजु पाटील, एस. बी. मदहळी, एम. के. व्हळयान्नावर, शिवाजी खोत, वसंतराव हुक्कीरी, जिल्हाध्यक्ष शामराम खोत यांची मनोगत झाली. यावेळी अ. भा. हणबर गवळी समाज सचिव रामचंद्र यमेटकर, नगरसेवक सौ. आशा टवाळे (निपाणी), नायब तहसिलदार अशोक पाटील, गणपती पाटील, दयानंद पाटील, ट्रस्ट अध्यक्ष सादिक नगारसे, सुभाष थोरात, एन. आर. पाटील आदींसह राज्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here