सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा; सायबर सुरक्षा कार्यशाळेतील सूर

राज्यात 43 सायबर पोलीस ठाणे तर 47 सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहेत

0

सोलापूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या क्रांतीमुळे उदयास आलेल्या समाज माध्यमांद्वारे सर्वांना माहितीचे दार खुले झाले आहे. मात्र समाज माध्यमांचा वापर करताना आवश्यक सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांचा वापर अविवेक वृत्तीने होऊ नये यासाठी जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. जागृतीसाठी पत्रकार व या क्षेत्रातील जाणकारांनी काम करावे. सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा, अशी अपेक्षा सायबर सुरक्षा जाणीव जागृती कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.

सायबर गुन्हेबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सहायक पोलीस निरीक्षक मधुरा भास्कर म्हणाल्या, इंटरनेटने सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी, मेसेज पाठवणे, ई गव्हर्नन्स, फेसबुक, व्हॉट्स ॲप, व्टिटर, व्हिडीओ कॉल यामुळे जगातले लोक खूपच जवळ आले आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारांनी नवीन कल्पना शोधून लोकांचा पैसा आणि गोपनियतेला धोका निर्माण केला आहे. याला आळा घालण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आले आहेत. इंटरनेट, समाज माध्यम वापरकर्ते यांनी या माध्यमांचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली कोणतीही गोपनीय माहिती त्रयस्त व्यक्तीला देऊ नये.

राज्यात 43 सायबर पोलीस ठाणे तर 47 सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर कायदा अस्तित्वात आला असल्याचे सांगून श्री. गायकवाड म्हणाले, या कायद्याच्या जनजागृतीसाठी पत्रकारांनी सतत लिखाण करावे. आपली सामाजिक जबाबदारी समजून या कायद्याची जनजागृती करावी. यावेळी त्यांनी सायबर कायद्यातील विविध कलमांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here