व्यावसायिक कौशल्य विकासाकरीता टेमा चा पुढाकार

0

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-सी एस आर योजनेअंर्तगत राबविण्यात येणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास उपक्रम योजनेनुसार तलासरी तालुक्यातील अच्छाड येथे जिल्ह्यातील स्थानिक व आदिवासी युवकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन संपन्न झाले. टेमा आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा,पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

यानुसार सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार. असल्याचे टेमाचे मुख्य संस्थापक तथा मॅनेजिंग डायरेकटर हरेश सीप्पी यांनी जाहीर केले. ३ वर्षाच्या कालावधीत ५०० मुलांना यामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून यामधे जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे तर प्रशिक्षणानंतर यातूनच बेरोजगार तरुणांना याचा फायदा होऊन नक्कीच रोजगार उपलब्ध होऊ शकेल असा वीश्वासही हरेश सीप्पी यांनी व्यक्त केला.


टप्प्याटप्प्याने या योजनेचा विस्तार केला जाणार असल्याचे टेमाकडून जाहीर करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण वरखंडे, लुईस काकड, धर्मा गोवारी, सुरेंद्र निकुंभ, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, तहसीलदार स्वाती घोंगडे,
सह्याद्री हॉटेलचे संचालक अजित नार्वेकर, टेमा चे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here