सिरसंगी येथे बाळूमामा भंडारा उत्सव

0

वार्ताहर किणे :
सिरसंगी येथे बाळूमामा भंडारा उत्सव उत्साहात पार पडला. बाळुमामाच्या नावान चांगभलं म्हणत भंडारा उधळत बाळुमामाची पालखी मुरवणुक उत्साहात पार पडली. या पाच दिवसाच्या उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील फुगडी पथक तर आप्पाचीवाडी येथील धनगरी नृत्याचा कार्यक्रम तसेच कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आप्पाचीवाडी हलसिद्धनाथ येथील भगवान आप्पसो महाराज यांचा भाकनुकीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी अहमदनगर येथील दत्तात्रय महाराज सुद्रीक पाटील यांच्या अनाथाश्रमातील २५० बाल भक्तांनी यामध्ये सहभाग नोंदविला. यानंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here