पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा सिनेउद्योगाचा निर्णय

0

मुंबई (प्रतिनिधी) :

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी गोरेगाव येथील फिल्मसिटीमधील शूटिंग बंद ठेवण्यात आलं होतं. दुपारी येथे पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जवानांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

यावेळी अशोक पंडित म्हणाले, ‘फिल्म इंडस्ट्रीत लाखो लोक सुरक्षा दल आणि सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आमचे असोशिएशन IFTDAने निर्णय घेतला आहे की पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केलं जाणार नाही.’

या कार्यक्रमात सिनेउद्योगातील मंडळींसह वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ हे क्रिकेटपटूही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here