सिद्धार्थ देसाई कबड्डीतील सचिन तेंडुलकर आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे प्रतिपादन

कबड्डीपट्टू सिद्धार्थ देसाईंची अभूतपूर्व मिरवणूक

0

वार्ताहर कोवाड : आम्ही राजकारणी माणसं आम्हाला राजकारणापलीकडे काही दिसत नाही. पण आमच्या मातीत जन्मलेल्या सिद्धार्थच्या कबड्डी खेळात आम्हालाही कब्बडीतील आता समजू लागत आहे. प्रो. कब्बडीतील खेळ पाहता सिद्धार्थ हा कब्बडीतील सचिन तेंडुलकर आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही, असे विचार चंदगड आमदार संध्यादेवी कुप्पेकर यांनी व्यक्त केले. हुंदळेवाडी येथे सिद्धार्थ देसाईंच्या नागरी सत्कार सोहळ्यात अध्यस्थानावरून त्या बोलत होत्या.
प्रास्ताविक विलास देसाई यांनी केले. आमदार कुपेकर म्हणाल्या, सिद्धार्थने यु-मुंबाकडे खेळताना कोवाड भागाचा ठसा उमटविला, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर त्याने यश संपादन केले आहे. पुणे येथील बाणेर संघातून त्याने राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे नाव उंचावले आहे. सिद्धार्थचा शरद पवार साहेबांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. याचा मुलं खूप आनंद झाल्याने त्यांनी सांगितले. युवानेत्या डॉ. नंदिनी बाभुळकर म्हणाल्या, सिद्धार्थच्या खेळीने चंदगड तालुक्यात नवचैतन्याचे वातावरण आहे. सिद्धार्थ देसाईंचे गुरु बाबुराव चांदरे म्हणाले,सिद्धार्थलवकरच देशासाठी खेळेल. जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण म्हणाले, सिद्धार्थ-सुरजचे वडील कार्याद भागाचे उत्तम रायडर म्हणून परिचित होते. अशा या शिरीष देसाई यांच्या दोन्ही मुलींनी हुंदळेवाडी गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवले. महाराष्ट्र केसरी विजेते पै. विष्णू जोशीलाकार म्हणाले, सिद्धार्थच्या जंगी मिरवणुकीने १९८५ साली काढण्यात आलेल्या माझ्या गावातच कब्बडीचे ज्ञान प्राप्त झाले आहे. सत्कारमूर्ती सिद्धार्थ देसाई म्हणाला, शालेय काळात अनेक स्पर्धेतून भाग घेतला. खेळात जीव ओतून खेळू लागतो, त्यामुळे प्रो. कब्बडीच्या सहाव्या हंगामात माझ्यासाठी दरवाजे खुले झाले. यु-मुंबा हा लोकप्रिय संघातून खेळताना मी खूप काही शिकलो आहे. यापुढील काळात मी देशासाठी खेळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी पुणेरी पलटण संघाचा खेळाडू अक्षय जाधव, उद्योगपती, उत्तम मुळीक, गुंडोपंत देसाई, शंकर मनवाडकर, सरपंच सुप्रिया कांबळे, उपसरपंच जनार्दन देसाई, ठेकेदार विलास पाटील, पंचायत समिती सदस्य नंदिनी पाटील, रूप खांडेकर, एम.जे. पाटील, तेजस्विनी पाटील, विष्णू आडवं, शिरीष देसाई, सविता देसाई, सुरज देसाई, जॉन लोबो उपस्थित होते. सिद्धार्थचे कोवाडनगरीत आगमन होताच येथील दुर्गामाता मंदिर ते हुंदळेवाडी गावापर्यत ढोल, ताशांच्या गजरात, शाळकरी मुलामुलींच्या लेझीमच्या तालात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात मिरवणूक काढली. उघड्या जीपमधूनही मिरवणूक निघाली. आभार प्रा. सुभाष बेळगावकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here