श्री स्वयंभू हायस्कूलचे करवीर तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत यश

0

श्री स्वयंभू हायस्कूल बोलोली च्या विद्यार्थ्यानी करवीर तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत यश संपादन केले. या शाळेच्या अजित सुरेश पाटील (कुस्ती 42 कि.- प्रथम), अभिजीत गोरखनाथ पाटील (उंचउडी – द्वितीय), प्रातिक्षा कृष्णात बाटे (उंचउडी – द्वितीय), स्वराज लक्ष्मण पाटील (कराटे- प्रथम) या खेळाडूंनी यश मिळविले. या खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धसाठी झाली आहे. त्याचबरोबर रोहीणी पांडुरंग पांचाकटे (धावणे – तृतीय), गुरूप्रसाद तुकाराम शिपेकर (उंचउडी – तृतीय), स्वाती कुंडलीक पाचाकटे (भालाफेक – तृतीय), सोनल संभाजी दुगुळे (उंचउडी – तृतीय) या विद्यार्थ्यानीही यश संपादन केले आहे. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक के.के. मंडलीक, क्रीडाशिक्षक एस. एस. राणे व संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here