बँकांचे दैनंदिन व्यवहार मराठीत करण्यात यावे व शहरातील दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्या यासाठी मनसेच्या वतीने निवेदन.

0

जयश्री भिसे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे की, बँकेचा व्यवहार हा संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेनुसारच असावा. मात्र तसं होताना दिसत नाही. प्रत्येक राज्यात बँकेचा व्यवहार हा त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये होतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कामोठे येथील बॅंकांना तसेच पनवेल कामगार आयुक्त यांना मनसे कामोठे शहरअध्यक्ष रोहित दुधवडकर यांच्या नेतृत्वात मनविसे उपशहर अध्यक्ष जयकुमार डिगोळे यांच्यातर्फे या विषयास अनुसरुन निवेदन देण्यात आले , बँकेचे कामकाज हिंदी व इंग्रजीत होत असुन शासनाच्या नियमाची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बँक अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला तसेच शहरातील दुकानांचे फलक मराठी भाषेत असावेत यासाठी कामगार आयुक्त पनवेल यांना निवेदन देण्यात आले.

मराठी अस्मितेची मराठी भाषेची होत असलेली हेळसांड व मिळत असलेली दुय्यम वागणुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापी सहन करणार नाही. यानंतरही जर मराठी भाषेचा सन्मान होत नसेल तर मनसेच्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलना दरम्यान होणारया परिणामांस बँक प्रशासन व संबंधित दुकानदार स्वत: जवाबदार राहिल असा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी मनसे माजी शहर अध्यक्ष कमलाकर गायकर, उपशहराध्यक्ष मनोज कोठारी, विशाल चौधरी, विक्रम घोरपडे , उप प्रभागअध्यक्ष भागवत सरगरमनविसेचे शहराध्यक्ष नरेंद्र गायकर, प्रफुल्ल पाटिल , किरण थोरात आदि मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here