शिवजयंती नियोजनासाठी शनिवारी गडहिंग्लजला व्यापक बैठक

0

गडहिंग्लज : येथील सकल मराठा व श्री शिवाजी मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वसमावेशक व भव्य प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जयंतीनिमित्त चित्ररथ स्पर्धा आयोजित करणे, मिरवणुकीसाठी नाशिक ढोल, झंजपथक, मुलामुलींचे लेझीम पथक यांचा सहभाग व एखाद्या नामवंत वक्त्याचे व्याख्यान आयोजित करणे या संदर्भात व्यापक बैठक शनिवारी दि. ९ रोजी सायंकाळी नगरपालिकेच्या शाहू व सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. गडहिंग्लज शहर व परिसरातील सर्व समाजाचे प्रमुख प्रतिनिधी, सर्व मंडळाचे प्रमुख पादाधिकारी, महिला मंडळाच्या सर्व भगिनी व सर्व शाळा, महाविद्यालयाचं प्रतिनिधी यांनी हा शिवमहोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा व श्री शिवाजी मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. बैठकीस श्री शिवाजी मराठा मंडळाचे अध्यक्ष किरणराव कदम, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. यशवंत कोले, प्रतापराव सरदेसाई, लक्ष्मण पोवार, रामभाऊ शिवणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, अमर मांगले, प्रकाश पोवार, शिवाजी कुराडे, डॉ. किरण खोराटे, तुषार यमगेकर, युवराज पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here