शिवराज विद्या संकुलाचे स्नेहसंमेलन उत्साहात

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. डॉ. आनंद कुंभार यांनी स्वागत केले. पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांच्या हस्ते गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उद्योजक सुनील चौगुले यांनी मार्गदर्शन केले. माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. केदारी रेडेकर संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, अॅड. एस. एस. गुरव, डॉ. यशवंत चव्हाण, बाळासाहेब परीतकर, डॉ. किरण खोराटे, अभिषेक शिंपी यांच्या हस्ते विविध विभागांचे उद्घाटन झाले. एम. आर. कांबळे यांचा काव्यगायनाचा कार्यक्रम झाला. अॅड. सतीश ईटी, प्रवीण आजगेकर, रमण लोहार, मलिक बुरुड, बसवराज आजरी, विजय पाटील आदी उपस्थित होते. विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन राजशेखर दड्डी यांच्या हस्ते झाले. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव प्रा. अनिल कुराडे, अॅड. दिग्विजय कुराडे, शंकर नंदनवाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here