शिवाजी विद्यापीठास सर्वसाधारण उपविजेतेपद

0

कोल्हापूर – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे दि. 5 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित 15 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा एकूण 40 सदस्यांचा संघ सहभागी झालेला होता. या युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाने एकूण 19 स्पर्धांपैकी 12 स्पर्धा प्रकारात यश मिळवत इंद्रधनुष्य युवा महोत्सवात पंधरा वर्षात प्रथमच या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा ऋषिकेश देशमाने या विद्यार्थ्यास ‘गोल्डन बॉय’ म्हणून गौरविण्यात आले.

या युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाने कातरकाम – प्रथम क्रमांक, मातीकाम – द्वितीय क्रमांक, भित्तीचित्र – प्रथम क्रमांक, लघुनाटिका – प्रथम क्रमांक, वाद्यवृंद – प्रथम क्रमांक, वेस्टर्न ऑर्केस्ट्रा – तृतीय क्रमांक, समुहगीत – तृतीय क्रमांक, सूरवाद्य – प्रथम क्रमांक, तालवाद्य – प्रथम क्रमांक, शास्त्रीय गायन – तृतीय क्रमांक, लोकनृत्य – द्वितीय क्रमांक, मूकनाटय – द्वितीय क्रमांक, फाईन आर्टस्मध्ये विजेतेपद तर एकूण स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकाविला. या संघास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, डॉ. टी. पी. शिंदे, प्रा. एल. सी. वेळेकर, प्रा. शुभांगी कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here