डहाणूतील दिलीप पटेलने रेखाटले शिवाजी महाराजांचे टैटू

0

पालघर-योगेश चांदेकर

डहाणू- डहाणू तालुक्यातील राई या गावात राहणाऱ्या 27 वर्षीय दिलीप नरोत्तम पटेल याने शिवाजी महाराज यांच टैटू पाठीवर तर संभाजी महाराज यांच गणेश रूपातील टैटू 8 तासात रेखाटले आहे मुंबई येथे आयोजीत करण्यात आलेल्या इंक ब्रदर टेटू फेस्टिवल मुंबई वाशी यामधे दिलीपने सहभाग घेतला होता. शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दलची संकल्पना सांगणारा व संभाजी महाराज यांची एक वेगळी कलाकृति रेखाटत त्याने एक वेगळी संकल्पना ठेवली या फेस्टिवलमधे देशभरातील 150 स्पर्धक यांनी यात सहभाग नोंदवला.

दरम्यान दिलीप नरोत्तम पटेल हा अतिशय गरीब कुटुंबातुन असून त्याची घरची परिस्थिति अत्यंत हलाखीचि विदन्यान शाखेतून पदवी घेतल्यानंतर त्याने मुंबईमधील त्याचे गुरु सनी भानूशाली यांच्याकड़े त्याने तीन वर्ष प्रशिक्षण घेतले त्यानंतर दिलीप डहाणूतील राजीव मणियार यांचे मार्गदर्शन घेतले व जिल्हा उद्योगकेंद्राच्या माध्यमातून त्याने ड्रीम टैटू या नावाने व्यवसाय सुरु केला अनेक ठिकाणी रोजगारासाठी भटकत असताना त्याने खुप प्रयत्न केले कुटुंबाचा उदरनिर्वाहाचि पूर्ण जवाबदारी ही दिलीपवर असल्याने त्याने या सर्वावर मात करत खचुन न जाता सुरवातीला घरोघरी टैटू काढण्यास सुरवात करून जे पैसे मिळतील त्यातून तो आपल कुटुंब चालवायचा आणि जीद्द आणि चिकाटिच्या जोरावर व्यवसायातुन आज तो दिवसाकाठी एकहजार ते 2000 इतके पैसे कमावत आहे.

दरम्यान गेली 7 वर्षात त्याने सामाजिक, सांस्कृतिक, कलाकृतिद्वारे 5 ते 6000 चित्र रेखाटले आहेत आत्तापर्यन्त त्याने महाराष्ट्राची प्रतिनिधित्व करताना इंटरनॅशनल लेवलला 2, देशपातळीवर 2 महाराष्ट् लेवलला एक असे ब्रॉन्ज मेडलसह 5 पुरस्कार पटकावले आहेत. त्याने नुकत्याच झालेल्या फेस्टिवलमधे एक अनोखा आदर्श ठेवत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे आठबाय 7 इंचचे टैटू 8 तासात पूर्ण केले आहे. दिलीपने आपल्या परिस्थितिवर मात करत एक अनोखा आदर्श तयार केला आहे त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here