शिवसेना सुरु करणार संपर्क दौरा

केरळ दौ-यावरुन उध्दव ठाकरे मुंबईत परतल्यानंतर संपर्क दौऱ्याला होणार प्रारंभ

0

प्रतिनिधी :  जयश्री भिसे

मुंबई – स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्र पिंजून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात चालणाऱ्या संपर्क मोहिमेंतर्गत पहिला दौरा संभाजीनगरचा असून, उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारीला तेथे दाखल होणार आहेत. बीड, लातूर त्यानंतर यवतमाळला ते भेट देणार आहेत. केरळ येथे छायाचित्रणासाठी गेलेले ठाकरे मुंबईत परतल्यानंतर संपर्क दौऱ्याला प्रारंभ करतील.

या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, पक्षबांधणीसंदर्भातही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, राज्यातील परिस्थिती बिकट असून, तळागाळातील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या समजून घेणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जातीय राजकारणापासून महाराष्ट्राला दूर ठेवले, तोच वारसा उद्धव ठाकरे चालवणार आहेत, असेही त्यांनी सांगितल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here