परळ मधील JBCN शाळा शिवसैनिकांनी बंद पाडली

आमदार अजय चौधरीसह अनेक शिवसैनिकांची शाळेवर धडक

0

प्रतिनिधी- जयश्री भिसे

मुंबई- छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती आज असून देखील परळ मधील JBCN इंटरनॅशनल शाळा चालू ठेवण्यात आली होती. पालकांनी या बाबत शाळा प्रशासनाला विचारले असता शिवजयंती आपली नाही त्यामुळे तुम्ही मुलांना पाठवलं नाही तर मेमो देऊ असे उर्मट उत्तर शाळा प्रशासनाने पालकांना दिले. या घटनेची माहिती मिळताचं शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी JBCN शाळेवर धडक दिली आणि शाळा बंद पाडली.

यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख गजानन चव्हाण,पराग चव्हाण,महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्षा सिंधुताई मसुरकर यांसह अनेक महिला/पुरुष शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here