शिक्षक सेनेचा वर्धापन दिन संपन्न

0

पालघर-योगेश चांदेकर

  डहाणू- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा दुसरा वर्धापन दिन डहाणू तालुक्यातील दुर्वांकर सभागृह येथे पार पडला या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता यामधे कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला,शिक्षक गुणगौरव पुरस्कार,भव्य रक्तदान शिबिर,डहाणू तालुक्यातील जिल्हापरिषद शाळेतील आदिवासी  गरीब गरजू असे एकूण १८ विद्यार्थी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक डहाणू यांनी दत्तक घेऊन त्यांचा शेवटपर्यन्त शिक्षण,आरोग्य व इतर खर्च उचलणार असल्याचे जाहिर केले.

 दरम्यान वर्धापन दिन सोहळ्यास आमदार अमित घोड़ा जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश गंधे,तालूका प्रमुख संतोष वझे, डहाणू विधानसभा संपर्क प्रमुख समीर सागर,जिल्हा परिषद गटनेते प्रकाश निकम,जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी रहाणे, विठल ठाणगे,लायन दिनेश रॉय,संजय कांबळे आदि मान्यवरासह  तसेच शिक्षक मोठ्या संखेने उपस्थित होते. दरम्यान वर्धापन दीन सोहळ्यानिमित्त शिक्षकांच्या समस्या व त्यांच्या व्यथा उपस्थितानी जाणून घेतल्या व त्यावर शिवसेनेच्या माध्यमातुन तोडगा काढू असे आश्वासन आमदार अमित घोड़ा, नीलेश गंधे,प्रकाश निकम यांनी दिले शिक्षक सेनेच्या माध्यमातुन सामाजिक बांधीलकी जपत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.याचाच एक भाग म्हणून शिक्षक गुणगौरव,कर्तुत्वान महिलांचा सन्मान,दत्तक विद्यार्थी कार्यक्रम अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here