शाहू समाधीस्थळ निधीवरून घमासान निधीसाठीच्या विशेष सभेत सत्ताधारी – विरोधात खडाजंगी : .. तर निधीसाठी झोळी घेऊ : उपमहापौर

0

प्रतिनिधी कोल्हापूर :राजर्षी शाहू समाधीस्थळीसाठीची बुधवारी झालेली विशेष सभा निधीवरून गाजली. राज्य शासनाने निधी दिला नाही तर शहरात झोळी घेऊन पैसा जमा करू, असे विधान उपमहापौर भूपाल – ताराराणी आघाडीचे सदस्य आक्रमक झाले. यानंतर निधीवरून महासभेत सत्ताधारी काँग्रेस – राष्ट्रवादी आणि भाजप – ताराराणी आघाडीच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट आरोप केला. यामुळे वाद आणखीन चिघळला.
महापालिकेच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळाचे काम सुरु आहे. मागील महिन्यामध्ये महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे यांनी कामाची पाहणी केली. येथील प्रलंबित कामांसाठी ७५ लाखाच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली. यावर महापौर मोरे यांनी तातडीने निधीच्या तरतुदीसाठी म्हणून बुधवारी विशेष सभा आयोजित केली होती.
उपमहापौरांच्या वक्तव्यावरून वाद
राजर्षी शाहू समाधीस्थळासाठी राज्य शासन, मनपाकडून जर निधी मिळत नसेल तर झोळी घेऊ, अशा शब्दात उपमहापौर भूपाल शेट यांनी आपली भूमिका मांडली जिल्हा नियोजनामध्ये पैसे नसल्याचा दाखल त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here