संत गजानन महाराज शिक्षण समूहात एसजीएम एक्सप्लोर २०१८

0

अभिनेत्री अमृता खानविलकरची उपस्थिती

महागाव : सतत नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संत गजानन महाराज शिक्षण समूहाने एसजीएम एक्सप्लोर २०१८ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवारी ४ जानेवारी रोजी ह्सुरवाडी येथील संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये टॅलेंट हन्ट, म्युझिक रॉक्स बॅन्ड, डी जे नाईट असा रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित राहणार आहे अशी माहिती संस्थेचे विश्वस्त डॉ.यशवंत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संस्थाध्यक्ष आण्णासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. प्रभावशाली व्यक्तिमत्व,बौद्धिक क्षमता,जनरल नॉलेज,संभाषण कौशल्य या निवड चाचणीद्वारे पात्र ठरलेल्या फार्मसी,इंजिनिअरिंग,नर्सिंग,पॉलीटेक्नीक,डी एड विध्यालयाच्या विध्यार्थ्यांमधून मिस्टर आणि मिस एसजीएम हा किताब घोषित करण्यात येणार आहे. विजेत्यांना हिरो स्प्लेंडर, हिरो प्लेजर,उपविजेत्यांना मोबाईल हॅडसेट तसेच उत्तेजनार्थ शूज,गॉगल,आकर्षक पेहराव,मोबाईल पॉवर बँक यासह इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमासाठी खास प्रशस्त मैदान तयर करण्यात आले असून त्यावर भव्य रंगमंच आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. या कार्यक्रमाचे रेडीओ पार्टनर टोमॅटो एफ एम आणि टेलीविजन पार्टनर साम टीव्ही आहे.

विध्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर सुप्त कलागुणांना वाव मिळावा,त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे डॉ.यशवंत चव्हाण यांनी सांगितले. यावेळी डॉ. संजय चव्हाण,शिरीष गणाचार्य,ब्रिजेश तळवडेकर,रवींद्र गवळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here