पोटच्या मुलीवरच वर्षभरापासून लैंगिक अत्याचार

सफाळ्यात जन्मदात्या पित्याचे हैवानी कृत्य

0

प्रतिनिधी- योगेश चांदेकर

पालघर- एका नराधम पित्याकडून स्वतःच्याच ८ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार होत असल्याची खळबळजनक घटना समोर आली असून हा प्रकार सफाळे पूर्वेकडील पेणंद गावातून उघडकीस आला आहे. याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात आरोपी सीताराम पागी याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सह पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली.

पेणंद गावात आरोपी सीताराम पागी हा आपली पत्नी व १५ वर्षीय मुलगा आणि ८ वर्षीय मुलगी यांच्या सोबत राहत होता. सीताराम कोणताच कामधंदा करीत नसल्याने त्याची पत्नी झाडांची पाने व भाजी विकण्यास मुंबईत जात असल्याने त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. पत्नीच्या पैशाची दारू पिणे आणि लोकांना दमदाटी करणे हे काम सीतारामचे चालू होते दरम्यान दारूच्या अत्यंत आहारी गेलेल्या सीतारामला वासनेने पछाडले होते. आपल्या शरीराची भूक भागविण्यासाठी हा नराधम घरात कोणी नसताना स्वतच्या मुलीचेच लैंगिक शोषण करू लागला. पित्याच्या अशा वागण्यामुळे ती रडून त्याला विरोध करीत असे. त्यामुळे सीताराम ती हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून दमदाटी व मारहाण करीत होता. पित्याच्या दुष्कृत्याला घाबरून ती मुलगी मागील वर्षभर हा अत्याचार सहन करीत आली.

मात्र नियतीने त्या नराधम पित्याचा पापाचा घडा भरत त्याचे हे अमानवी कृत्य सर्वांसमोर आणलेच. शनिवारी १७ रोजी सितारामची पत्नी नेहमीप्रमाणे मुंबईला निघून गेली. दुपारच्या वेळी पिडीत मुलगी व तिचा भावू दोघेच घरातील दुसऱ्या खोलीत झोपले होते. सीतारामने संधीचा फायदा घेत झोपलेल्या मुलीला दुसर्या खोलीत नेवून तिच्यावर तो लैंगिक अत्याचार करू लागला. त्यामुळे ती ओरडू लागली तिच्या आवाजाने भावाला जाग येवून त्याने हा प्रकार पहिला. तसाच तडक बाहेर जावून त्याने आपल्या मामीला या प्रकारची माहिती दिली. त्याची मामी व शेजारील काही महिलांनी सदर मुलीला पित्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्या नराधमाने आपला कार्यभाग साधत पळ काढला. पिडीत मुलगी बाथरुममध्ये दरवाजा बंद करून रडत होती. मामीने धीर देत तिला बाहेर बोलावले असता ती रक्ताळलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची गावात चर्चा होवून गावकरी सीतारामला या घटनेबाबत विचारू लागले. मात्र त्याने सर्वांना दमदाटी करत गावातच हा विषय संपविण्याचा प्रयत्न केला. यानंतर सितारामची पत्नी आपल्या दोन्ही मुलांना घेवून केळवे येथील माहेरी निघून गेली. यासंदर्भात सफाळे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घडल्या प्रकारची सवितर चौकशी करीत आरोपी सीताराम पागी यास अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here