गडहिंग्लजमध्ये सेंद्रिय भाजीपाला केंद्राचे उद्घाटन

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

सध्या सर्वच पिकांसाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे. किटकनाशकांचा वापर देखील वाढला आहे. हे मानवाच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे सर्वत्र राजच्या गरजेची भाजी सेंद्रिय असावी, अशी मागणी वाढली आहे. हाच उदात्त हेतू बाळगून गडहिंग्लजमधील अयोध्यानगर कॉर्नरला अंश सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन गडहिंग्लजच्या उपनगराध्यक्षा सुनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, मंजुषा कदम, नगरसेविका श्रध्दा शिंत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील, बेनिता डायस, कावेरी चौगुले, अर्चना रिंगणे, रेखा पोतदार, विमल गुरव, विद्या बरगे, सुषमा मगदुम, विजया व्हळतकर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here